अपशिंगे येथे पाण्याचा ताळेबंद व शिवार फेरी मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत व दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत अपशिंगे यांच्यावतीने अपशिंगे मध्ये सर्व ग्रामस्थांना मिळून पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला तसेच शिवार फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी अपशिंगे येथील मोठ्या संख्येने तरुण वर्ग महिला ज्येष्ठ लोक उपस्थित होती. यावेळी पंचायत समितीतील कृषी विभागाचे राहुल गिरणारे साहेब उपस्थित होते. अपशिंगेचे लोकनियुक्त सरपंच भारत सूर्यवंशी यांनी अपशिंगे गावातील भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर अपशिंगे सर्व सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. व त्यानंतर कडेगाव पंचायत समितीचे राहुल गिरणारे साहेब यांनी पाण्याच्या ताळेबंद समजून सांगितला व लोकांनी कोणती पिके घ्यावीत. पाण्याची बचत कशी करावी पाण्याचा स्त्रोत कसा निर्माण करावेत. जलतारा खड्डे, मातीनाला बांध, सीसीटी डीप सीसीटी, सिमेंट नाला बांध कोणत्या भागात करता येतील व जी जमीन पड आहे ती कशी शेती वापरा करता वापरण्यात येईल याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गावातील तलाव व विहिरी व बंधाऱ्यांचे पाहणी करण्यात आली. गावचा नकाशा व शिवाराचा नकाशा काढण्यासाठी
अधिकराव सूर्यवंशी व ग्रामस्थांनी मदत केली.
यावेळी अपशिंगे गावची उपसरपंच राज सूर्यवंशी, जगन साठे, अपशिंगे गावचे माजी उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी लीना देशमुख, हर्षल सूर्यवंशी, संग्राम सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, आनंदराव सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, संदीप भोसले, भोसले, विश्वनाथ सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, विशाल लोंढे, सागर लोंढे, संजय सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, आकाश कवरे, उमेश पवार, नीता सुर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, सिद्धेश्वर चव्हाण, नामदेव सूर्यवंशी, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

