संवादयात्रा व करवसुली विशेष मोहीम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत अपशिंगे, ता. कडेगांव, जि. सांगली
घरपट्टी, पाणीपट्टी करामध्ये ५०% सूट
(३१ डिसेंबर २०२५ पर्यंत)
शासन निर्णय – व्हीपीएम-२०२५/प्र.क्र.६२/पंरा. १

ग्रामपंचायत अपशिंगे ग्रामसभा दि. २५/११/२०२५ चा ठराव नं. १ ने ५०% सूट देण्याचा निर्णय खालील अटी-शर्तीनुसार घेण्यात आला आहे. तरी या योजनेचा लाभ सर्व खातेदारांनी घ्यावा ही विनंती.

अटी व शर्ती
सन २०२५-२६ म्हणजे चालू वर्षाचा पूर्ण कर एकरकमी भरावा लागेल.
१ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी मध्ये ५०% सवलत राहील. उर्वरीत ५०% रक्कम एकरकमी भरावी लागेल.
सदर सवलत फक्त अभियान कालावधी करिता म्हणजे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असेल.
चालू वर्षाचा कर आणि मागील थकबाकीच्या ५०% कर एकरकमी भरला तरच सवलत लागू होईल.

आपले,
ॲड. श्री. भारत हणमंतराव सुर्यवंशी (लोकनियुक्त सरपंच)
सौ. लिना अतुल देशमुख (ग्रामपंचायत अधिकारी)
श्री. रविराज हणमंत सुर्यवंशी (उपरपंच)
ग्रामपंचायत अपशिंगे, सर्व सदस्य, कर्मचारी ता. कडेगांव, जि. सांगली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top