जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व ग्रामपंचायत अपशिंगे यांच्या संयुक्त उपक्रमाने अपशिंगे तालुका कडेगाव येथे तेरा दिवसाचे मोफत कृषी उद्यमी या प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील पुरुष महिला एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढावे, त्यांनी स्वयम् रोजगार करावा या उद्देशाने अपशिंगे गावातील गरजू महिलांना तसेच पुरुषांना आर से टी सांगली कडून सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये कृषीउद्योमी व्यवसायातील संधी, शेतीची मशागत, पिकांचे खत नियोजन, पेरणी अगोदरची मशागत, माती
परीक्षण शेती लागवड यासंदर्भात माहिती तसेच गाय, म्हैशी, शेळी, कुक्कुटपालन या शेतीपूरक व्यवसायाची माहिती इत्यादी विषयावर भर दिला आहे. या अभ्यासक्रमासोबत व्यक्तिमत्व विकास उत्तम संभाषण कौशल्य उद्योजकीय सक्षमता बँकेचे व्यवहार आणि विविध शासकीय योजनेची माहिती आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन अपशिंगे गावचे सरपंच ड भारत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी अपशिंगे गावचे माजी उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, ग्राम विकास अधिकारी लीना देशमुख, हिरकणी महिला प्रभाग संजय सचिव माधवी यादव, सीआरपी अपशिंगे नीता सूर्यवंशी, कोतवडे सीआरपी ज्योती सूर्यवंशी, नेरली सीआरपी पल्लवी गायकवाड, धैर्यशील सूर्यवंशी, सुनंदा भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्रशिक्षक श्री प्रवीण पाटील सर यांनी केले. व मार्गदर्शन महेश तुकाराम पाटील यांनी केले.

