अपशिंगे ता. कडेगाव येथे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते माजी वसुंधरा योजनेची सुरवात करण्यात आली. या माध्यमातून अपशिंगे ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेतलेला आहे पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून निसर्गाच संवर्धन करण्याची भुमिका अपशिंगेकर घेत असल्याची भुमिका जितेश कदम यांनी व्यक्त केली आहे यावेळी सरपंच भारत सूर्यवंशी शिवाजी सूर्यवंशी अजित मुळीक किसन सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना जितेश कदम म्हणाले कि पर्यावरण हा अत्यंत महत्वाचा विषय असुन मानवी वंशाचे अस्तित्वच पर्यावरणावरती अवलंबून आहे जर पर्यावरणावरती घातला गेला तर निश्चितच मानवी वंशावरही घाला येईल त्यामुळे मानवी वंशाचे जतन आणि रक्षण करायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
त्या दृष्टिकोणातूनच माजी वसुंधरा योजनेच्या माध्यमातून अपशिंगे ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी चालु केलेली हि मोहिम अतिशय कौतुकास्पद आहे येणार्या काळामध्ये अपशिंगे हे पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एक रोड मॉडेल गाव बनेल या बाबत मला निश्चित खात्री आहे. यावेळी विस्तार अधिकारी पवनकुमार चव्हाण चेअरमन नामदेव सूर्यवंशी किसन सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी जगन साठे दिनकर साठे, उपसरपंच रविराज सूर्यवंशी, अंकुश कुंभार, धोंडीराम सूर्यवंशी, ग्रामसेविका लीना देशमुख, हरिभाऊ साखरे, हरिभाऊ सूर्यवंशी रामकृष्ण सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी लक्ष्मण सूर्यवंशी, इंजि संग्राम सूर्यवंशी, संदेश साठे, मोहन सूर्यवंशी, संदिप भोसले नेर्लीचे गंगाराम मुळीक, दिलीप सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी, अधिक सूर्यवंशी यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

