अपशिंगे ग्रामपंचायतच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाच्या कार्यक्रमा नुसार अपशिंगे ग्रामपंचायतच्या वतीने अपशिंगे येथील अठरा वर्षावरील महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर तपासणी व व बीपी तपासण्याचे काम नेर्ली येथील उपप्राथमिक केंद्राच्या माध्यमातून मोफत करण्यात येत आहे.
यावेळी अपशिंगे गावचे सरपंच भारत सूर्यवंशी म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या उपक्रमानुसार अपशिंगेतील सर्व महिलांचे हिमोग्लोबिन तपासले जाणार आहे व तपासल्यानंतर ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी असेल त्यांना औषधोपचार केल्या जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत ने अपशिंगे येथील सर्व पुरुष व महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड व आबा कार्ड काढून दिले जाणार आहे. तसेच या शिबिरामध्ये महिलांची शुगर तपासणी व बीपी ही तपासला जात आहे. आणि ही सर्व सुविधा मोफत दिली जात आहे. या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व गोल्डन कार्ड, आयुष्मान कार्ड हिमोग्लोबिन तपासून घेतले.

या शिबिरासाठी डॉक्टर प्रज्वल सावंत, नेर्ली येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्र च्या सिस्टर दुबिले मॅडम अपशिंगे येथील अशा सेविका नीता साळुंखे मॅडम व नेरली खंबाळे औंध कोतवडे येथील अशा सेविकांचे व उपसरपंच रविराज सूर्यवंशी, माजी उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी लीना देशमुख, ऑपरेटर वर्षा सूर्यवंशी, पाणीपुरवठा कर्मचारी सचिन सूर्यवंशी, सुनंदा भोसले, शिवाजी सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, आनंदराव सूर्यवंशी दिलीप सूर्यवंशी काका वैशाली शिंदे कर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top